अंतरगाव ग्रामपंचायत

ग्रामपंचायत अंतरगाव

Grampanchayat Antargaon

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे, यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येणार आहे.

- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराजअभियानाचा हेतू -

• विकासाच्या योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी
• योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे
• लोकांचे जीवनमान उंचावणे
• नागरीकांना सुलभ रीतीने सेवा पुरविणे
• आरोग्य, शिक्षण,उपजीविका, सामाजिक न्याय यामध्ये काम करणे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत अंतरगाव ग्रामपंचायतने केलेली कामे

🚫 1. प्लास्टिकमुक्त गाव

गावात प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

🧹2. मासिक स्वच्छता उपक्रम

दर महिन्याला ग्रामस्थांच्या श्रमदानातून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली जाते.

♻️ 3. घनकचरा व्यवस्थापन

प्रत्येक घरात कचरा वर्गीकरणासाठी कुंड्या वाटप करण्यात आल्या आहेत.

🌳4.वृक्षलागवड मोहीम

रस्त्यांच्या कडेला, शाळा परिसरात व सार्वजनिक जागांवर वृक्षलागवड; नियमित देखरेख आणि पाणीपुरवठा

🌳 5.गाव जंतुनाशक फवारणी

रस्त्यांच्या कडेला, शाळा परिसरात व सार्वजनिक जागांवर  जंतुनाशक फवारणी

🚰 6. पाणीपुरवठा व स्वच्छता सुविधा

  शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

💧 7. रेन वॉटर हार्वेस्टिंग

गावातील सर्व अंगणवाड्यांमध्ये पावसाचे पाणी साठवण्याची (Rainwater Harvesting) व्यवस्था करण्यात आली आहे

🚰 8.भूमिगत गटार व्यवस्था

भूमिगत गटार व्यवस्था

💡 प्रकाश व्यवस्था व डिजिटल सुविधा

गावातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर उर्जेवर चालणाऱ्या युनिट्स बसवण्यात आल्या आहेत.

  • 🔆
    LED रस्तादिव्यांचे संपूर्ण गावात जाळे
  • 💻
    डिजिटल ग्रामपंचायत
  • 📹
    गावात सर्वत्र CCTV कॅमेरे

🏛️ ग्रामविकास व इतर सोयी

  • 🏢 सुसज्ज ग्रामपंचायत इमारत
  • 🪑 छायादार बसण्याची व्यवस्था (समशानभूमी सहित)
  • ⛩️ हनुमान मंदिर – ग्रामदैवत
  • 🛣️ उत्तम दर्जाची अंतर्गत रस्ते व्यवस्था
  • 🐄 पशुवैद्यकीय दवाखाना
  • ♻️ बायोगॅस निर्मिती सुविधा

📚 शैक्षणिक सुविधा

गावातील अंगणवाडी शाळा डिजिटल साधनांनी सज्ज करण्यात आल्या आहेत.

  • 🖥️ जिल्हा परिषद शाळेत E-Learning प्रणाली
  • 🎯 विद्यार्थ्यांसाठी शासकीय योजना अभिसरण

🏠 गृहनिर्माण योजना

  • 🏘️ प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल योजनेतून लाभार्थ्यांची घरे
  • 📑 घरकुलांचे प्राधान्यक्रमानुसार वितरण

🌐 डिजिटल ग्रामपंचायत सेवा

ग्रामपंचायत नागरिकांना ऑनलाईन दाखले, तसेच “मेरी पंचायत”, “पंचायत निर्णय” आणि “ग्राम संवाद” अ‍ॅप्सचा वापर करण्यात मदत करते.