अंतरगाव ग्रामपंचायत

ग्रामपंचायत अंतरगाव

Grampanchayat Antargaon

Shri Devendra Fadnavis
माननीय मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस
Shri Eknath Shinde
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
Shri Ajit Pawar
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार
Shri Jaykumar Gore
माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. जयकुमार गोरे
Shri Yogesh Kadam
माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. योगेश कदम
Shri Eknath Dawale
प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. एकनाथ डवले
Varsha Thakur
जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी.धाराशिव
श्री. किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.)
Rahul Kumar Meena
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव
श्री. डॉ. मैनाक घोष (भा.प्र.से)
anant
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत),जिल्हा परिषद धाराशिव
श्री.अनंत कुभार
Anandkumar Mirgane
गट विकास अधिकारी,भुम
श्री. लक्ष्मण रामा वाजे
Anandkumar Mirgane
सरपंच – अंतरगाव ग्रामपंचायत सौ. विद्या विठ्ठल बनसोडे
Anandkumar Mirgane
उप-सरपंच– अंतरगाव ग्रामपंचायत सौ. अश्विनी भागवत खैरे
Anandkumar Mirgane
ग्रामपंचायत अधिकारी –अंतरगाव ग्रामपंचायतश्री. दीपक होळकर

गावा विषयी

अंतरगाव हे धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यात वसलेले एक प्रगतिशील आणि सांस्कृतिक परंपरांनी नटलेले गाव आहे. भुमपासून अंदाजे 21 कि.मी. आणि जिल्हा मुख्यालय धाराशिव पासून 69 कि.मी. अंतरावर हे गाव आहे.
2009 साली अंतरगाव हे स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून स्थापन आहे.

बाणगंगा नदी तिरावर अंतरगाव बसलेले आहे आणि  स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार सन २०२१/२२ मिळाला आहे.

गावाचे पिनकोड 413502 असून टपाल व्यवस्था परांडा पोस्टद्वारे चालते. गावाच्या पूर्वेला वाशी, दक्षिणेला परांडा, पश्चिमेला जामखेड आणि दक्षिणेला बार्शी तालुके लागून आहेत.

गावात भव्य ग्रामसंसद भवन बांधण्यात आले असून या कार्यालयामार्फत आपले सरकार सेवा केंद्र चालवले जाते. या केंद्राद्वारे सर्व नागरिकांना वेळेवर संगणकीकृत दाखले व ऑनलाईन सेवा दिल्या जातात.

गावात हनुमान मंदिर तसेच, विठ्ठल-रुक्मिणी आणि महादेव मंदिर ही प्रमुख धार्मिक स्थळे आहेत. स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड, पिण्याचे पाणी, बाकडे व शेडची व्यवस्था करण्यात आली असून ते ठिकाण अत्यंत निसर्गरम्य आहे.

गावातील प्रत्येक घरात ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी दोन कचरा कुंड्या देण्यात आल्या आहेत.
अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळांची रंगरंगोटी, डिजिटल शिक्षण प्रणाली, प्रोजेक्टर व सुंदर बेंचेस यांच्या साहाय्याने विद्यार्थी १००% उपस्थित राहून शिक्षण घेत आहेत.

गावाचा इतिहास

अंतरगाव  हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेने समृद्ध गाव आहे. गावातील प्राचीन मंदिरे, वार्षिक यात्रा आणि धार्मिक परंपरा हे गावाच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहेत. जुनी लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक सण या गावाच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवतात.

लोकसंख्या
0
एकूण कुटुंबे
0
पंचायत सदस्य
0
क्षेत्रफळ
0
प्रकल्प चालू
0

अंतरगाव — सुविधा व विकासकामे

ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या प्रमुख सोयीसुविधांची माहिती

🧹 स्वच्छता व पर्यावरण

  • 🚯
    प्लास्टिक बंदी अभियान
  • 🧼
    गाव स्वच्छता मोहीम
  • 🛻
    घनकचरा व्यवस्थापन व घंटागाडी सेवा
  • 🗑️
    डस्टबिनचे गावभर वितरण
  • 🌳
    वृक्षलागवड मोहीम
  • 🦠
    गाव जंतुनाशक फवारणी

💧 पाणीपुरवठा व स्वच्छता सुविधा

  • 🚰
    घरगुती नळजोडणी व पुरेसा पाणीपुरवठा
  • 💦
    पाणी आडवा-पाणी जिरवा (PAST) योजना
  • 🕳️
    भूमिगत गटार व्यवस्था
  • 🌧️
    शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग
  • 🧊
    RO फिल्टर पाणी सुविधा

💡 प्रकाश व्यवस्था व डिजिटल सुविधा

  • 🔆
    LED रस्तादिव्यांचे संपूर्ण गावात जाळे
  • 💻
    डिजिटल ग्रामपंचायत
  • 📹
    गावात सर्वत्र CCTV कॅमेरे

🏛️ ग्रामविकास व इतर सोयी

  • 🏢
    सुसज्ज ग्रामपंचायत इमारत
  • 🪑
    छायादार बसण्याची व्यवस्था (समशानभूमी सहित)
  • ⛩️
    हनुमान मंदिर – ग्रामदैवत
  • 🛣️
    उत्तम दर्जाची अंतर्गत रस्ते व्यवस्था
  • 🐄
    पशुवैद्यकीय दवाखाना
  • ♻️
    बायोगॅस निर्मिती सुविधा

📚 शैक्षणिक सुविधा

  • 🖥️
    जिल्हा परिषद शाळेत E-Learning प्रणाली
  • 🎯
    विद्यार्थ्यांसाठी शासकीय योजना अभिसरण

🏠 गृहनिर्माण योजना

  • 🏘️
    प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल योजनेतून लाभार्थ्यांची घरे
  • 📑
    घरकुलांचे प्राधान्यक्रमानुसार वितरण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतने केलेली कामे...

अंतरगाव – प्रगतिशील गावाकडे वाटचाल

अंतरगाव हे पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले गाव असून, स्वच्छता, डिजिटल सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी या सर्व बाबींमध्ये गावाने आदर्श कार्य केले आहे. सामुदायिक एकजुटीच्या जोरावर अंतरगाव आज “विकसित व सुरक्षित गाव” म्हणून ओळखले जाते.

सरपंच सौ विद्या विठ्ठल बनसोडे ...

सन 2023 पासून ग्रामपंचायतीच्या कार्यभाराची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, गावातील सर्व ग्रामस्थ, ग्रामसेवक, सदस्य आणि विविध विभागांच्या सहकार्याने अंतरगाव ग्रामपंचायतीने सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे.

ग्रामपंचायतीने “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना”जनसुविधा योजना यांच्या अभिसरणातून अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी गायींचे गोठे उभारणी, निराधार, अपंग, विधवा व ज्येष्ठ नागरिकांसाठी मानधन योजना, तसेच महिला बचत गट प्रशिक्षण, रोजगार निर्मिती उपक्रम, बोलकी शाळा, बोलकी अंगणवाडी, सौर ऊर्जेवर चालणारी ग्रामपंचायत यांचा समावेश आहे.

तसेच ओला व सुका कचरा व्यवस्थापन, गाव अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, शेतरस्ते विकास, बालविवाह बंदी, प्लास्टिक बंदी यांसारख्या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या सहभागातून पारदर्शक प्रशासन, स्वच्छता, आणि सतत प्रगती यांचा आदर्श उभा केला आहे.

आमचे उद्दिष्ट केवळ भौतिक विकास नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि महिलांच्या सक्षमीकरणाद्वारे सामाजिक विकास साधणे हे आहे. स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार सन २०२१/२२ मिळाला आहे.अंतरगाव गाव आदर्श आणि स्मार्ट ग्रामपंचायत बनविण्याच्या दिशेने निश्चितपणे पुढे जात आहे.

“गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांचे सहकार्य हीच आमची खरी ताकद आहे.”

— सौ विद्या विठ्ठल बनसोडे
सरपंच,अंतरगाव

📝 नागरिकांसाठी तक्रार / अभिप्राय

अंतरगाव ग्रामपंचायत नागरिकांसाठी तक्रारी व अभिप्राय ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपल्या समस्येची माहिती देऊन ग्रामपंचायतीस सहकार्य करा.

➡️ तक्रार / अभिप्राय नोंदवा
तारीख नोटिस शीर्षक तपशील
०४ ऑक्टोबर २०२५
ग्रामसभा सूचना
पुढील ग्रामसभा दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ५:०० वाजता ग्रामपंचायत भवन येथे होणार आहे. सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे.
३० सप्टेंबर २०२५
पाणीपुरवठा बंद सूचना
ग्रामपंचायत हद्दीत देखभाल कामांमुळे १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायं. ५ या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील.
२५ सप्टेंबर २०२५
ग्रामपंचायत कर भरणा सूचना
२०२५-२६ वर्षाकरिता घरपट्टी व पाणीकर भरण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२५ आहे. वेळेत भरणा करा.
  • जल जीवन मिशन” अंतर्गत नवीन पाईपलाईन बसविण्याचे काम सुरू.

  • गावात सौर ऊर्जेवर आधारित रस्ते दिवे बसविण्याचा प्रकल्प मंजूर.

  • स्वच्छ ग्राम – हरित ग्राम” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे.

  • ग्रामपंचायत कार्यालयात डिजिटल पेमेंट काउंटर सुरू.

  • नागरिकांसाठी “SmartGaav Citizen Portal App” लवकरच उपलब्ध होणार.

दाखवण्यासाठी उपलब्ध माहिती नाही

लवकरच आवश्यक तपशील येथे उपलब्ध केले जातील..

दाखवण्यासाठी उपलब्ध माहिती नाही

लवकरच आवश्यक तपशील येथे उपलब्ध केले जातील..

दाखवण्यासाठी उपलब्ध माहिती नाही

लवकरच आवश्यक तपशील येथे उपलब्ध केले जातील..

दाखवण्यासाठी उपलब्ध माहिती नाही

लवकरच आवश्यक तपशील येथे उपलब्ध केले जातील..

प्रमुख कार्यक्रम

लाभार्थी रजिस्टर

सरकारी योजना

गावातील छायाचित्रे , ध्वनिचित्रफित

छायाचित्र दालन

आमच्या चॅनलवर सरकारी योजना, आणि कृषी विषयावरील महत्वाचे व्हिडिओ पाहा.

आमच्या Facebook पेजला लाईक करा आणि सरकारी योजना अपडेट्स पहा

 आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सरकारी योजना व कृषी अपडेट्स मिळवा.

Instagram वर आम्हाला फॉलो करा — ताज्या अपडेट्ससाठी.कार्यक्रम आणि घोषणा यांचे अपडेट्स